7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी-पेन्शन धारकांसाठी खूशखबर, मोदी सरकारने 4 टक्के वाढवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए (महागाई भत्ता) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने खूशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए (महागाई भत्ता) चार टक्केंनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 38 टक्केंवरुन 42 टक्के केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णायामुळे कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. प्रत्येकवर्षी मार्चमध्ये केंद्र सरकार डीएमध्ये वाढ करते.
केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चार टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या असलेला 38 टक्के महागाई भत्ता वाढून 42 टक्के इतका होईल.
टिप्पण्या