दुधावर घट्ट-जाड साय येण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स, साय मिळेल दणदणीत- घरीच करा भरपूर तूप.
दुधावर घट्ट-जाड साय येण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स, साय मिळेल दणदणीत- घरीच करा भरपूर तूप.
मराठा संपादकीय : दुधावर जाड आणि घट्ट सायीचा थर येण्यासाठी आपल्याला काही पद्धती बदलाव्या लागतील.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरांत दुधावरची घट्ट व जाड साय दररोज साठवून ठेवली जाते. या साठविलेल्या सायीचे तूप किंवा इतर काही पदार्थ तयार केले जातात. अनेकजण दर आठवड्याला अर्धा किलो दूध वेगळे खरेदी करुन त्या दुधापासून भरपूर साय काढून घरी तूप बनवतात. दुधावर चांगली घट्ट साय जमून येण्यासाठी काही लोक फुल्ल क्रिम किंवा जास्त फॅट्स असलेले महागातले दूध विकत घेतात. इतकं सगळं करुन देखील बऱ्याच लोकांची तक्रार असते की, चांगल्या दर्जाचे दूध विकत घेऊनही घट्ट व जाड साय मिळत नाही. काहीवेळा दुधावरची साय काढताना ती पातळ किंवा कमी प्रमाणांत निघते. दुधावर घट्ट व जाडसर सायीचा थर यावा यासाठी अनेक गृहिणी कित्येक उपाय करुन पाहतात.

दुधावर घट्ट-जाड साय येण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स, साय मिळेल दणदणीत- घरीच करा भरपूर तूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 10:20 PM
How To Get Thick Malai On Milk : दुधावर जाड आणि घट्ट सायीचा थर येण्यासाठी आपल्याला काही पद्धती बदलाव्या लागतील.
दुधावर घट्ट-जाड साय येण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स, साय मिळेल दणदणीत- घरीच करा भरपूर तूप
आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरांत दुधावरची घट्ट व जाड साय दररोज साठवून ठेवली जाते. या साठविलेल्या सायीचे तूप किंवा इतर काही पदार्थ तयार केले जातात. अनेकजण दर आठवड्याला अर्धा किलो दूध वेगळे खरेदी करुन त्या दुधापासून भरपूर साय काढून घरी तूप बनवतात. दुधावर चांगली घट्ट साय जमून येण्यासाठी काही लोक फुल्ल क्रिम किंवा जास्त फॅट्स असलेले महागातले दूध विकत घेतात. इतकं सगळं करुन देखील बऱ्याच लोकांची तक्रार असते की, चांगल्या दर्जाचे दूध विकत घेऊनही घट्ट व जाड साय मिळत नाही. काहीवेळा दुधावरची साय काढताना ती पातळ किंवा कमी प्रमाणांत निघते. दुधावर घट्ट व जाडसर सायीचा थर यावा यासाठी अनेक गृहिणी कित्येक उपाय करुन पाहतात.
खरंतर दुधावर जाड आणि घट्ट सायीचा थर येण्यासाठी आपल्याला काही पद्धती बदलाव्या लागतील. घरच्या घरी जर आपल्याला जाड आणि घट्ट साय हवी असेल तर, दुधाची गुणवत्ता, दूध उकळण्याची योग्य पद्धत आणि ते साठवण्यासाठी भांड्यांची निवड यांसारख्या अनेक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. दुधावर जाड व घट्टसर साय येण्यासाठी गृहिणी बर्याच युक्त्या अवलंबतात, परंतु बर्याच वेळा जाड साय दुधावर येत नाही. प्रत्येक गृहिणीला दुधातून जाड व घट्टसर साय बाहेर पडायला हवी असं वाटतं. यासाठी काही खास ट्रिक्स लक्षात ठेवूयात(How To Get Thick Malai On Milk).
दुधावर जाड व घट्ट साय काढण्यासाठी नक्की काय करावं?
१. फुल क्रिम दुधाचा वापर करा :-
दुधावर जाड व घट्ट साय येण्यासाठी दुधात फॅट्सचे प्रमाण जास्त असलेले दूध विकत घेणे योग्य ठरेल. यासाठी टोन्ड दूध किंवा गाईच्या दुधाऐवजी फुल क्रिम किंवा फुल फॅट्स असलेले दूध घेतल्यास मलई घट्ट व जाडसर येईल.
२. दूध अशाप्रकारे उकळवा :-
बहुतेकवेळा आपण फ्रिजमधून दूध काढून थेट उकळायला ठेवतो. परंतु असे केल्याने दुधातील साय चांगल्या प्रकारे बाहेर पडत नाही. त्यामुळे दूध लगेच फ्रिजमधून काढून उकळण्यास किंवा गरम करण्यास गॅसवर ठेवू नये. दूध उकळण्याआधी साधारण २० ते ३० मिनिटे सामान्य तापमानावर येऊ द्यावे. त्यानंतरच दूध गरम करण्यासाठी किंवा उकळवण्यासाठी गॅसवर ठेवावे. अशाप्रकारे दूध उकळवल्यास दुधावर जाड व घट्ट साय येण्यास मदत होते.
३.गरम दूध झाकून ठेवू नका :-
दूध गरम होऊन उकळल्यानंतर लगेचच त्यावर झाकणी ठेवून दूध झाकून ठेवू नका. गरम केलेल्या दुधावर जाळीचे झाकण किंवा चाळणीने झाकून ठेवल्यास त्यावर साय येण्यास मदत होते. जेव्हा दूध सामान्य तापमानावर येते तेव्हाच ते प्लेटने झाकून ठेवावे. असे केल्याने, जाड व घट्ट साय रात्रभर दुधावर स्थिर होईल.
४. दूध उकळताना चमच्याने ढवळत रहा :-
दूध उकळायला लागल्यावर गॅसची आच मंद करा आणि चमच्याने किंवा पळीच्या मदतीने सतत ढवळत राहा. ही कृती पुढील ४ ते ५ मिनिटांसाठी सतत करत रहा. आपल्याला दिसेल की हळूहळू बुडबुडे कमी होऊ लागले आहेत. नंतर गॅस बंद करा. दूध सामान्य तापमानावर (रुम टेम्परेचरला) आल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवा.
६. दुधावर साय येण्यासाठी दुधाला रात्रभर सेट होऊ द्या :-
साय तयार करण्यासाठी रात्री एकदा दूध तापवून घेतल्यानंतर आता दुधाचा वापर करू नका. दूध कमीतकमी ३ तास फ्रिजमध्ये ठेवा. मग मलई जाड होईल आणि सेट होईल. समजा रात्री तुम्ही या पद्धतीनं दूध गरम करून ठेवलं तर सकाळी आपण दुधामधून साय बाहेर काढून एका स्वच्छ भांड्यात साठवून ठेवू शकता. घरगुती तूप बनवण्यापासून ते मिठाई बनवण्यापर्यंत याचा उपयोग होऊ शकतो.
टिप्पण्या