Bank Holiday : एप्रिल महिन्यात एकूण 16 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट..
आजपासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. या पहिल्या महिन्यातच बँकांना भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतील. म्हणजेच या सुट्ट्या प्रत्येक राज्य आणि शहरांमध्ये वेगवेगळ्या असतील. म्हणूनच बँकिंगच्या कामासाठी जर आपण घर सोडणार असाल तर त्याआधी सुट्ट्यांची लिस्ट तपासा.
एप्रिलमध्ये जवळपास अर्धा महिना बँकांना सुट्ट्या असतील. दर महिन्याप्रमाणेच RBI कडून एप्रिल महिन्याच्या सुट्ट्यांची लिस्टही जरी करण्यात आली आहे. या महिन्यात रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसहित एकूण 16 दिवस सुट्ट्या आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर सुट्ट्यांची लिस्ट सहजपणे तपासता येईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून विविध राज्यांतील कार्यक्रमांच्या आधारे सुट्ट्यांची लिस्ट त्यांच्या वेबसाइटवर अपडेट केली जाते. तसेच https://m.rbi.org.in//Scripts/HolidayMatrixDisplay.aspxया लिंकवर क्लिक करून प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्यांची माहिती घेऊ शकाल.
टिप्पण्या