*माहेर म्हणजे काय?*🌹*३८ व्याख्या माहेर शब्दाच्या*
🌹*माहेर म्हणजे काय?*🌹
*३८ व्याख्या माहेर शब्दाच्या*
मराठा एडिटोरिअल:-
१)माहेर म्हणजे...
- महिना दोन महिने आधीच कॅलेंडरवर लक्ष ठेवून माहेरी जाण्यासाठी प्रवासाची तिकिटं काढून ठेवणं.
२)माहेर म्हणजे...
'या वेळी मी आईकडे जास्त दिवस राहाणार' असं नव-याला ठणकावून सांगणं.
३)माहेर म्हणजे...
- माहेरी जाण्याच्या कल्पनेने चेह-यावर तेज यायला सुरवात होणं.
४)माहेर म्हणजे...
- उत्साहाच्या भरात कपड्यांची बॅग भरायला घेणं.
५)माहेर म्हणजे...
- "पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊ या" असं आपल्या लेकरांना आनंदाने ओरडून सांगणं.
६)माहेर म्हणजे...
- बसस्टाॅपवर सोडायला आलेल्या नव-याला हस-या चेह-याने टाटा करणं.
७)माहेर म्हणजे...
- बसस्टाॅपवर उतरल्यावर रिक्षावाला म्हणेल त्या किंमतीत माहेरच्या रस्त्याला लागणं.
८)माहेर म्हणजे...
- त्या घराच्या पन्नास- पंचावन्न पाय-या दहा-बारा ढांगात संपवणं.
९)माहेर म्हणजे...
- कोणीतरी दार उघडेपर्यंत दरवाजावरची बेल दाबून ठेवणं.
१०)माहेर म्हणजे...
- उंबरठ्याच्या बाहेर उभं राहून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणा-या आईकडे प्रेमाने पाहाणं.
११)माहेर म्हणजे...
- उंबरठ्याच्या आत पाय टाकायची घाई होणं.
१२)माहेर म्हणजे...
- चपला काढण्याआधीच आधीच बाबांच्या गळ्यात पडणं.
१३)माहेर म्हणजे...
- वहिनीने प्रेमाने आपल्या बॅगा आत नेऊन ठेवणं.
१४)माहेर म्हणजे...
- "किती वाळली माझी लेक" असं आईने केसांतुन हात फिरवत म्हणणं.
-१५) माहेर म्हणजे...
"चला आजपासून काय धमाल करायची?" असं मामाने भाच्याला कौतुकाने विचारणं.
१६)माहेर म्हणजे...
- स्वयंपाकघरात डोकावून, "आज काय बेत?" असं नुसतं विचारणं.
१७)माहेर म्हणजे...
- आवडीच्या पदार्थांची फर्माईश करणं.
१८)माहेर म्हणजे...
- जेवणाची वेळ झाल्यावर पहिल्या पंगतीत बसून जेवायला सुरवात करणं.
१९)माहेर म्हणजे...
- सकाळी जाग येईल तेव्हा आरामात उठणं.
२०)माहेर म्हणजे...
- सोफ्यावरून उठून खुर्चीवर बसणं. आणि हो खुर्चीवरून उठून बेडवर लोळत पडणं.
२१)माहेर म्हणजे...
- गावातल्या मैत्रीणींना फोन करून सिनेमा-नाटकाचे प्लॅन आखणं.
२२)माहेर म्हणजे
- बालपणीच्या जुन्या फोटोंचा पसारा काढून बसणं.
२३)माहेर म्हणजे...
- कोणत्याही पाचकळ विनोदांवर खळखळून हसणं.
२४)माहेर म्हणजे...
- अंगणातल्या झोपाळ्यावर बसून वेळी-अवेळी पुस्तक वाचणं.
२५)माहेर म्हणजे...
- गच्च पोट भरल्यानंतरी आईने दहीभात खाण्याचा आग्रह करणं.
२६)माहेर म्हणजे...
- ८/१० दिवस पटकन् संपून गेल्यासारखे वाटणं.
२७)माहेर म्हणजे...
- सासरी परत जातांना दोनाच्या चार बॅग झालेल्या असणं.
२८)माहेर म्हणजे...
- निघतेवेळी जड मनाने आईबाबांना वाकून नमस्कार करणं.
२९)माहेर म्हणजे...
- YES!! ऐनवेळी सासरी जाणं २ दिवसाने पुढे ढकलणं.😛
३०) माहेर म्हणजे...
- "सासरच्यांना नीट जप हो" असं आईने प्रेमाने पाठीवर हात फिरवत सांगणं.
३१)माहेर म्हणजे...
- बसमध्ये भावाने जड बॅगा ठेवायला मदत करणं.
३२)माहेर म्हणजे...
- "घरी पोहोचलीस की फोन कर" असं माहेरच्यांनी चारवेळा ओरडून सांगणं.
३३)माहेर म्हणजे...
- बस दिसेनाशी होईपर्यंत माहेरच्यांना हात हलवत निरोप देणं.
माहेर म्हणजे...
३४)- पुढच्या प्रवासासाठी प्राणवायू भरून घेणं.
३५)माहेर म्हणजे...
- "माझ्या माणसांना सुखात ठेव" ही देवाकडे प्रार्थना करणं.
३६)- माहेर म्हणजे...
"आम्ही खूप मजा केली मामाकडे" असं लेकरांनी खूप उत्साहाने त्यांच्या वडिलांना न थकता सांगणं.
३७)माहेर म्हणजे...
- फोन आला की खोलीचं दार लावत आईशी मनसोक्त गप्पा मारणं. 'काळजी करू नकोस गं आई' असं दर चार वाक्यांनंतर तिला ठामपणे सांगत राहाणं.
३८)माहेर म्हणजे...
- वयाच्या सत्तराव्या वर्षीही माहेरच्या आठवणींनी व्याकूळ होणं.😔
किती लिहावं माहेराविषयी ?...🌹🌿🌾
टिप्पण्या