समस्त भारतीय समाजाला अक्षय तृतीया, शिवजयंती आणि ईदच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹

समस्त भारतीय समाजाला अक्षय तृतीया, शिव जयंती आणि ईदच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹

 आज हे तिन्ही सण एकाच दिवशी आलेले आहेत म्हणून जरा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे संहिष्णू धोरण याविषयी थोडी माहिती सांगावीशी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर असताना आपल्या सैनिकांना सक्त सूचना देत असत, युद्धात जर कुराणाची प्रत हातात पडली तर ती योग्य सन्मानासह मुस्लिम व्यक्तीच्या हातात द्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत कधीही मुस्लिम मशिदी दर्ग्याला चालू असणाऱ्या सोयी बंद केल्या नाहीत.
               आज आपल्याला तिरस्काररहित समाज निर्माण करायची गरज आहे भारत लोकसंख्येने जगात पहिल्या नंबर वर पोहोचलेला आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला तेवढ्या मोठ्या प्रमाणात साधने उपलब्ध नाहीत आपल्याला या देशाला सुपर पॉवर बनवायचे आहे मग आपण हे कसे साध्य करू शकतो?
यासाठी सर्वात प्रथम आपण आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल जातीपातीची धर्माची बंधने ओलांडल्या शिवाय आपल्याला जगात सुपर पावर होता येणार नाही. देशाला सुपर पॉवर बनवायचे असेल तर उद्योग व्यापार वाढवावा लागेल, आणि हा उद्योग व्यापार वेगवेगळ्या देशांशी आजही आपला चालू आहे तसा, परंतु,आज आपण एकाच विचाराने जर प्रेरित होऊन समाजाचे ध्रुवीकरण करत बसलो तर आपल्या उद्योग व्यापाऱ्याला चालना मिळणार नाही. पर्यायाने सुपर पॉवर होण्याकडे टाकलेली आपली पावले ही सहिष्णू असली पाहिजेत.
  आज जवळजवळ 50 ते 60 लाख भारतीय युरोपीय देशात काम करतात, तर 35 ते 40 लाख भारतीय हे आखाती मुस्लिम राष्ट्रात काम करतात. त्याच्यामध्ये काहीजण नोकरी तर काहीजण उद्योग व्यवसाय करतात पण त्यांना कधी तिथे धर्माचा अडथळा येत नाही. युरोपीय लोक तर याबाबतीत खूप सहिष्णू असलेले आपल्याला दिसतात मुळात भारतीय समाज हा सुद्धा सहीष्णूच  आहे, भारताची पाच हजार वर्षांपूर्वीची संस्कृती आपल्याला सहिष्णुता शिकवते आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही सणानिमित्त आपण आपल्या भारतभूमीला महासत्ता बनवण्याचा संकल्प करूया रमजान शिवजयंती,ईद आणि अक्षय तृतीयेच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मार्च 2023 साठी ₹1,60,122 कोटी सकल GST महसूल जमा झाला.

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.