कोण आला रे कोण आला .... दिल्लीच्या सपोर्टसाठी पंत आला स्टेडिअममध्ये


Rishabh Pant in IPL : दिल्लीचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत याने मंगळवारी मैदानात हजेरी लावली.

Rishabh Pant in IPL : दिल्लीचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत याने मंगळवारी मैदानात हजेरी लावली. दिल्ली आणि गुजरात यांच्यादरम्यान अरुण जेटली स्टेडिअमवर सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दिल्लीचे चाहते आपल्या नियमीत कर्णधाराला मिस करत आहेत. प्रत्येक सामन्यात पंतचे फोटो अथवा पोस्टर दिसतात. आज दिल्लीतील सामन्याला ऋषभ पंत याने हजेरी लावली आहे. पंतचा स्टेडिअममध्ये बसलेला फोटो व्हायरल झाला आहे. ऋषभ पंत दिल्लीच्या सपोर्टसाठी मैदानात आला आहे.

2022 मध्ये भीषण अपघात झाल्यामुळे ऋषभ पंत काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. पुढील काही महिने त्याला क्रिकेट खेळता येणार नाही. पण दिल्लीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ऋषभ पंत याने आज स्टेडिअममध्ये हजेरी लावली. दुखापतीनंतरही पंत संघाला सपोर्ट करण्यासाठी आला आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय आहे. 

When life hits hard.. some people aren’t able to get up but some people get up and hit the life back. Rishabh Pant is prime example of the same.

  दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. पंतशिवाय दिल्लीचा संघ मैदानात उतरला आहे. दिल्लीची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पंतची कमी दिल्लीच्या संघाला नक्कीच जाणवत असेल, यात शंका नाही. 2022 डिसेंबरमध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली. पंत पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पंत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्यासाठी दिल्लीच्या संघाने खास गोष्ट केली. आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने पंतसाठी डगआऊटमध्ये जर्सी ठेवली आहे. त्याच्या नावाची जर्सी डगआऊटमध्ये ठेवण्यात आली आहे. पंत सामन्यात नसला तरी तो संघासोबत आहे, असा संदेश दिल्लीच्या संघाला द्यायचा असेल.. पंतसाठी दिल्लीच्या संघाने केलेला हा आदर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

पंतसाठी दिल्लीने काय केले पहा :-
दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. पंतशिवाय दिल्लीचा संघ मैदानात उतरला आहे. दिल्लीची धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पंतची कमी दिल्लीच्या संघाला नक्कीच जाणवत असेल, यात शंका नाही. 2022 डिसेंबरमध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली. पंत पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पंत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्यासाठी दिल्लीच्या संघाने खास गोष्ट केली. आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने पंतसाठी डगआऊटमध्ये जर्सी ठेवली आहे. त्याच्या नावाची जर्सी डगआऊटमध्ये ठेवण्यात आली आहे. पंत सामन्यात नसला तरी तो संघासोबत आहे, असा संदेश दिल्लीच्या संघाला द्यायचा असेल.. पंतसाठी दिल्लीच्या संघाने केलेला हा आदर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.

*माहेर म्हणजे काय?*🌹*३८ व्याख्या माहेर शब्दाच्या*

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.