Business Idea : पेपर बॅग उद्योगात आहे चांगला पैसा; मशीनची किंमत अन सरकारी अनुदान कसं मिळवायचं हे जाणून घ्या.


भारत देश हा युवकांचा देश आहे. नोकरी मधील अस्थिरता यामुळे सध्या अनेकजण व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. अनेकजण नोकरीला कंटाळून नवीन उद्योग सुरु करण्याचा विचार करतात. परंतु कोणता व्यवसाय करावा याबाबत अनेकांना चालना मिळत नाही. म्हणूनच आम्ही बिझनेसनामाच्या बिझनेस आयडिया या सदरात नवनवीन उदोगांबाबत तुम्हाला माहिती देत असतो. आज आपण पेपर बॅग उद्योग आणि त्यासाठी लागणारी मशीन व सरकारी अनुदान याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

पेपर बॅग उद्योगाला चांगलं भविष्य आहे.

भारतातच नाही तर जगात पेपर बॅग’चा अधिकाधिक वापर होतो. याआधी देशात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा अधिक वापर होत होता. त्याचं पिशव्या गटारात जाऊन अडकत होत्या. यामुळे बऱ्याचदा पुराची परिस्थीत घडू लागली. जर याच प्लास्टिक पिशव्या जनावरांनी खाल्ल्या तर त्या अधिकाधिक धोकादायक असतात. यावर अंकुश लावण्यासाठी ‘पेपर बॅग’चा अधिक वापर होऊ लागला. म्हणूनच पेपर बॅग उद्योगाला चांगले भविष्य आहे असे आपण म्हणू शकतो. यामुळे आता कागदी पिशव्या बनवण्याच्या व्यवसायास प्राधान्य मिळाले. हा व्यवसाय करण्यासाठी पेपर बॅग मशीनचा वापर केला जाऊ लागला. यामुळे ‘पेपर बॅग’ या उद्योगातील लार्ज मशिन हा मूलभूत घटक आहे.

पेपर बॅग बनवण्यासाठी कोणते मशीन वापरतात?

किराणा दुकानापासून ते मेडिकल स्टोअर्स, मॉल्स,बिअर शॉप, स्वीट मार्ट, हॉटेल या ठिकाणी ‘पेपर बॅग’ची मागणी वाढली आहे. यासाठी तीन प्रकारच्या पेपर बॅग मशीनींचा वापर केला जातोय. त्यातील पहिली बेबी मशिन, दुसरी मीडियम मशीन आणि तिसरी लार्ज मशीन हे पेपर मशीनचे तीन प्रकार आहेत. यापैकी हंजे लार्ज मशीनचा वापर अधिक होतो.


 लार्ज मशीनने ४ ते १२ लांबी तर २ ते ७ रुंदी एवढ्या अकराच्या पेपर बॅग बनवल्या जातात. तसेच हंगे लार्ज पेपर बॅग मशिनमध्ये ४ ते १८ इंच रुंदी आणि ७ ते २६ इंच लांबी एवढ्या आकाराच्या कागदी पिशव्या लार्ज मशीनच्या माध्यमातून बनवल्या जातात. या मशीनद्वारे सर्व प्रकारच्या पेपर बॅगचे मॅन्युफॅक्चरींग होतं. या लार्ज मशीनला तीन फेज असतात. ही मशीन घरगुती विजेवर देखील चालते. याच मशीनला प्रिंटर देखील जोडता येतो. त्या प्रिंटरचा उपयोग पेपर बॅगवर नक्षीकाम करण्यासाठी केला जातो. हंजे लार्ज मशीन ही या पेपर बॅग उद्योगाचा महत्वाचा गाभा आहे. हीच मशीन विकत घेण्यासाठी जवळ जवळ १ लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

 बँकेकडून सबसिडी आणि १ लाख रुपयांपर्यंत सूट

६ लाख ३५ हजार रुपये ही लार्ज मशिनची खरी किंमत आहे. परंतु यावर  पेपर बॅग मशिनची किंमत ५ लाख ३५००० एवढी आहे. हीच मशीन विकत घेण्यासाठी सुरुवातीला ५००० रुपयांची बुकिंग अमाऊंट देखील करता येते.  त्या सबसिडीवर कर्ज देखील काढता येणार आहे. बँकेतर्फे देखील ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे उद्योजकांना लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. एवढंच नाही तर हा उद्योग चालवण्यासाठी भांडवलानंतर मनुष्यबळाची आवश्यकता असते. मनुष्यबळ हे उद्योगधंद्यातील मूळ गाभा असतो.


पेपर बॅग व्यवसायासाठी आवश्यक मनुष्यबळ

कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर मनुष्यबळ आवश्यक असतं. त्याचप्रमाणे ‘पेपर बॅग’ व्यवसायात ३ ते ४ लोकांचं मनुष्यबळ आवश्यक असतं. यात एक सदस्य मशिन ऑपरेटिंगचं काम करतो. तर इतर दोन व्यक्ती हेल्पर म्हणून काम करत असतात. त्याचप्रमाणे १ सदस्य मार्केटिंगचे काम करत असतो. यामुळे या व्यवसायाला लागणारे मनुष्यबळ कमी आहे. यामुळे हा व्यवसाय करणे प्रत्येकाला सोईस्कर आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.

*माहेर म्हणजे काय?*🌹*३८ व्याख्या माहेर शब्दाच्या*

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.