Do not drink cold drinks after eating mango: आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका...
सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका. अन्यथा तुमचा मृत्यू होऊ शकतो.व्हॉटस् अॅपवर व्हायरल झालेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट.
आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका, फेक मेसेज होतोय व्हायरल..
व्हायरल झालेला संदेश :
बेसावधपणाची किंमत व म्रुत्यू .
आंबा खाल्ल्यानंतर Cold Drink पिऊ नका…..(खास करून मुलांवर लक्ष ठेवा)
सावधान…
काहि दिवसांपूर्वी काही प्रवासी चंडीगढ़ (पंजाब) येथे फिरावयास गेले होतेचंडीगढ़ येथे त्यांनी आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्डड्रिंक प्याले ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते सगळे बेशुध्द होऊ लागलेत्यांना तातडीने उपचारा करिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिथे त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले, डॉक्टरांनी मृत्युचे कारण असे सांगितले कि आंबा खाल्ल्यानंतर कोणतेहि कोल्डड्रिंक्स किंवा सॉफ्टड्रिंक्स पिऊ नये कारण आंब्यातील सिट्रिक अॅसिड आणि कोल्डड्रिंक्स मधील कार्बनिक अॅसिड एकत्र मिसळल्यामुळे शरिरात विष तयार झाले ज्यामुळे या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले.
कृपया हा मॅसेज आपल्या सर्व प्रियजनां पर्यंत पोहोचवा. जेणेकरूण त्या सर्वांना याविषयी जागरूक राहण्यास मदत होईल कारण सध्या उन्हाळा व आंब्याचा सिझन सुरू झाला आहे ……
आता उन्हाळा सुरू झालाय, त्याचबरोबर आंब्याचा सिझनही सुरू झालाय. त्यातच या व्हायरल संदेशात म्हटलंय की, आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका. अन्यथा तुमचा मृत्यू होऊ शकतो.
Fact Check / Verification
व्हायरल मेसेजमध्ये सर्वात खाली एक मोबाईल नंबर दिलाय. आम्ही त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
त्यात उल्लेख केल्याप्रमाणे काही प्रवासी चंदीगडला फिरायला गेले होते. त्यानंतर त्यांनी आंबा खालल्यावर कोल्ड ड्रिंक प्यायले. मग त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते बेशुद्ध झाले. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यानं मृत घोषित केले. या बातमीचा आम्ही गुगलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण आम्हांला कुठेही ही बातमी सापडली नाही.
आंबा आणि कोल्ड ड्रिंक याच्या रासायनिक प्रक्रियेवर कुठला वैज्ञानिक अभ्यास झालाय की नाही, हे देखील आम्ही तपासले. पण यावर कुठलाही अभ्यास झाला नसल्याचे आढळून आले.
मेसेजमधील सत्यता जाणून घेण्यासाठी यशोदा रुग्णालयाच्या डॉ. श्रुतिका शिनगारे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. या व्हायरल मेसेजबाबत डॉ. श्रुतिका यांनी सांगितले,”पिकलेल्या आंब्यामध्ये सिट्रिक अॅसिड खूपच कमी प्रमाणात असते. सॉफ्ट ड्रिंक बनवण्यासाठी कार्बोनिक अॅसिडचा वापर केला जातो. सिट्रिक अॅसिड आणि कार्बोनिक अॅसिड दोन्ही विक अॅसिड आहे. त्यांचा शरीरावर हानिकारक प्रभाव पडत नाही. पण जर कार्बोनिक अॅसिड ड्रिंक्सचे रोज सेवन केले तर त्यामुळे गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो. कार्बोनिक अॅसिडमुळे पोटात बुडबुडे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटू शकते.”
त्याचबरोबर आम्ही आहारतज्ञ राजेश्वरी शेळके यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी सांगितले,”सिट्रिक अॅसिड आणि कार्बोनिक अॅसिड यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. असं केल्यावर काही लोकांना अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण लगेच त्यामुळे कोणाचा मृत्यू होणार नाही.”
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या तपासात स्पष्ट झाले की, आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक प्यायले तर मृत्यू होतो. असा दावा केला जाणारा मेसेज फेक आहे. या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.
टीप :-सदर माहिती ही किसान सुविधा केंद्र योजना या ब्लॉग वरून घेण्यात आली आहे वाचकांच्या माहितीसाठी, यावर आम्ही Maratha Educational Editorial कोणताही दावा करत नाही.
टिप्पण्या