UPI पेमेंटवरील अतिरिक्त शुल्काची बातमी चुकीची, NPCI ने ट्विट करत दिले स्पष्टीकरण..

Maratha Editorial UPI : बुधवारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक स्पष्टीकरण जारी करत म्हंटले की, बँकेच्या खात्यावर आधारित युपीआय पेमेंट किंवा सामान्य युपीआय पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आपल्या निवेदनात NPCI ने स्पष्ट केले की, “प्रीपेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI)’ द्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनसाठी मर्चंट इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. मात्र, ग्राहकांना हे शुल्क द्यावे लागणार नाही.

          वास्तविक NPCI कडून PPI वॉलेट्सना इंटरचेंज UPI इकोसिस्टीमचा भाग बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच PPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या युपीआय ट्रान्सझॅक्शनवर 1.1 टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. त्यात असेही नमूद केले गेले आहे की, हा इंटरचेंज चार्ज फक्त PPI मर्चंट ट्रान्सझॅक्शनवरच लागू असेल, तसेच ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यावेळी हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, बँक खाते ते बँक खाते आधारित युपीआय पेमेंटसाठीही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच युपीआय सहीत PPI चे एकत्रीकरण केल्यानंतर ग्राहकांना कोणतेही बँक खाते वापरण्याचा पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे यानंतर ग्राहक आणि विक्रेते दोघांसाठीही बँक खाते ते बँक खाते ट्रान्सझॅक्शन मोफत असतील.

         चुकीची बातमी काय होती ???
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स वॉलेट किंवा कार्डद्वारे कोणत्याही ट्रान्सझॅक्शन करण्यावर शुल्क आकारले जाते. मात्र या नवीन परिपत्रकानंतर आता यूपीआय ट्रान्सझॅक्शनवरही हेच शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्यामुळे 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर 1.1 टक्के इंटरचेंज शुल्क आकारण्यात येणार आहे, असे एका परिपत्रकात सांगण्यात आले.
     हे पेमेंट बाहेर असतील:-
मा तर हे शुल्क फक्त व्यापाऱ्यांना पैसे देणाऱ्या ग्राहकांनाच द्यावे लागेल, असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. ज्यानुसार बँक खाते आणि UPI वॉलेटमधील पीअर-टू-पीअर आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट ट्रान्सझॅक्शनवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही. हे सर्व पेमेंट जुन्या नियमांनुसार केले जाणार आहेत.
       अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या:-
     
          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मार्च 2023 साठी ₹1,60,122 कोटी सकल GST महसूल जमा झाला.

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.